भद्रावती : शिवसेना जनसंपर्क कार्यालय, भद्रावती येथे युवासेना व शिवसेना वतीने रविवारी भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात युवकांनी जनसंपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश घेतला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि युवानेते खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या शिवसेना बळकटीकरणाच्या संकल्पनेनुसार असंख्य उत्साही युवकांनी धनुष्यबाण हाती घेत भद्रावती येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात आलेखभाऊ रट्टे (युवासेना जिल्हाप्रमुख) यांच्या मार्गदर्शनात व महेश जिवतोडे (युवासेना लोकसभा समन्वयक) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने युवक युवासेनेत दाखल झाले.
या वेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या उत्साहात उपस्थित राहून नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
Comments
Post a Comment