शेगाव पोलीसांची मोठी कारवाई : २ किलो गांजासह एक जण अटकेत

शेगाव पोलीसांची मोठी कारवाई : २ किलो गांजासह एक जण अटकेत  

शेगाव (ता. चंद्रपूर) – पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गावातील एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकून तब्बल २ किलो गांजा जप्त केला आहे. नितेश गौतम देठे (वय ३२, रा. चारगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  
जाहिरात
शेगाव पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की आरोपी नितेश देठे हा आपल्या राहत्या घरी विक्रीसाठी गांजा आणणार आहे. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचासह पोलीस पथकाने चारगाव बुद्रुक येथे छापा टाकला. या कारवाईत आरोपीच्या घरी दोन पिशव्यांमध्ये ठेवलेले गांजाचे दोन पॅकेट मिळून आले. एकूण २ किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे ४५ हजार १०५ रुपये इतकी आहे.  
जाहिरात
सदर कारवाईनंतर पंचनामा करून आरोपीविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२५ नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थांच्या नियमनाखालील कायद्याचे कलम ८(क), २०(ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.  

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. कारवाईत शेगाव पोलीस ठाणेदार एपीआय योगेंद्रसिंग यादव, पोउपनिरीक्षक सुमित कांबळे, सहा. फौजदार बंडू मोहुर्ले, पोहवा दिनेश ताटेवार, पोहवा छगन जांबुडे, पोलीस अंमलदार प्रफुल कांबळे, ज्ञानेश्वर केकान, चालक पोलीस अंमलदार रामेश्वर भिसे, प्रगती भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे अधिकारी सर्वेश बेलसरे, नितीन कुरेकर, नितीन साळवे, प्रमोद कोटणाके, गजानन मळावी व अमोल सावे यांनी सहभाग घेतला.  
*******

---  


Comments