जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवावे.
वरोरा : वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथे सोयाबीन पिकाच्या नाशामुळे झालेल्या आर्थिक संकटातून घायाळ झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.
: जामगाव बुद्रुक येथे राहणारे केशव देवराव आसुटकर या शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पिकाचे दाणे काळे पडलेले पाहिले. पीक नष्ट झाल्यामुळे मजुरांना देण्यासाठी पैसे नसणे, कुटुंबाचा आर्थिक डोलारा आणि बँकेचे कर्ज या चिंतेने ग्रासलेल्या केशव आसुटकर यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींवर मोठा आघात झाला असून कुटुंबप्रमुखाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सांत्वन पर भेट दिली . यावेळी मत्ते यांनी म्हटले की, सध्या सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्गावर मोठा आघात झाला आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे मागणी केली की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढू शकतात. या गंभीर परिस्थितीला सरकारने लगेच तोंड द्यावे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी. व कृषी उत्पन्न बाजार समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ वीस हजाराची मदत करण्याचे नियोजन करावे अशी मागणी मते यांनी केली आहे.
याप्रसंगी बोर्डा ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण बोरूले, उमेश देशमुख , प्रवीण बदकी, लक्ष्मण ठेंगणे, शंकर ढानके, अक्षय ताजने, प्रशांत ताजने, वाल्मीक ऊमरे आधी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment