नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?
वरोरा :30/10/2025
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा ते भद्रावती दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रहिवाशांसाठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, स्थानिक लोक सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर नाराज दिसत आहेत.
बारा ऑक्टोंबर ला टाकळी जवळील रस्त्यावर श्री. संदीप धरणेवार यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आणि त्यांच्या मित्राला तीव्र इजा झाल्या. अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यात आले, जेथे त्यांच्या उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे.
श्री. धरणेवार यांच्या प्रकरणीच नव्हे, तर भद्रावती येथील आणखी ३ ते ४ व्यक्तींचे अशाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, मागील बऱ्याच महिन्यापासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे जीविन दररोज धोक्यात आहे.
या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे, "सरकारी यंत्रणा कोणाच्या मरणाची वाट बघत आहे का?" त्याने सोशल मीडिया ग्रुपमधील विविध पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या विनंतीत म्हटले आहे, "आपण सर्व लोक समाजाची सेवा करण्यासाठी धडपडत आहात. ही पण एक सेवाच आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडे कडक पावले उचलावीत."
या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष देऊन काम करून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे हस्तक्षेपाची कडकडीची विनंती केली असून, लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------
Comments
Post a Comment