महसूल मंत्र्याकडे तक्रार करणार.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तहसील कार्यालयातील बरेचसे काम होत नसल्याने नागरिकांना मानसिक मनस्ताप होत असून बरेच दिवस लोटूनही काम न झाल्याने. चिरीमिरी देऊन दलाला कडून काम करावे लागत आहे. साधा नकाशा असो, सातबारा, फेरफार दुरुस्ती, ऑनलाईन सातबारा मध्ये आराजी मेन्शन करणे, असे शुल्लक कामे सुद्धा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याचेच उदाहरण म्हणून वरोरा येथील खांजी. आत्ताच टिळक वार्ड 102/NAP-36 मधिल 286 मधील एक प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे.) 1971 यातील नियम 3,5,6,7 मधील खांजी ( ५४०२०३)या क्षेत्रातील. गट क्रमांक व उपविभाग २८६ , वरोरा मधील प्लॉट धारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
भोगवटादार वर्ग १ मधील जमीन खाते क्रमांक ५८३३,७५३९,९७१८ अकृषक क्षेत्र बिन शेती असलेले १२१.००, बिनशेती १२१०.०० आकारणी असलेले भोगवटादार यांची नावे दिलेले आहे. अंदाजे या सात बारावरती 33 जणांची नावे आलेली आहे.
या जागेवरती प्लॉट धारकांनी प्लॉट पाडून ते विकले होते यानंतर बरेच लोक या ठिकाणी राहायला आले. त्यासाठी प्रत्येक प्लॉट धारकांनी आपले सातबारा अलग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. बरेच वेळा दलाला मार्फत सातबारा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र यांची किंमत मोठी असल्याने तो सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा मार्ग नव्हता. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून सातबारा वरती असलेले नावे वेगळे करून घेण्यासाठी तहसील कार्यालयात नागरी चकरा मारीत आहे.
मात्र यातच काही वशिलादार लोकांनी आपला सातबारा वेगळा केल्याचा दिसून येतो. मात्र सर्वसामान्य प्लॉट धारकांना अजूनही सातबारा वेगळा न केल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
११०३७ व ११०३९ यामध्ये वेगवेगळ्या दोन आराजी आहे. यामध्ये सामाईक सातबारातल्या नावासमोर आराजी क्षेत्रफळ नोंदवण्याकरीता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.
तहसीलदाराचे आदेश असून सुद्धा हे दुरुस्त करण्यासाठी सहा महिने उलटून गेले मात्र अजूनही सातबारावर दुरुस्ती झालेली नाही.
अशा बरेच तांत्रिक अडचणी तयार करून नागरिका कडून चिरीमिरी घेण्याची पद्धत तहसील कार्यालयात सुरू झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांचा प्रश्न सोडवावा. अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment