चंद्रपूर,दि. 10 : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्म व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे, यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आले. या वेळी भिष्म यांनी दिव्यांग विभागाच्या अस्थीरोग, बालरोग, मानसोपचार, नाक, कान, घसा, नेत्र या विभागास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली व सुचना केल्या. 6 से 18 वयोगटातील बालकांची तपासणी सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 14 व 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, निवासी वैद्यकिय अधिकारी (बाहय संर्पक) डॉ. हेमचंद कन्नाके, शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे, डॉ. उल्हास बोरकर, डॉ. अखिल लोहकरे, डॉ. राहुल भोंगळे, डॉ. संदिप भटकर, डॉ. सायली दाचेराव, डॉ. सचिन बिलबने, डॉ. उल्लास सरोदे तसेच दिव्यांग विभागाचे व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment