निवडणूक तयारीसाठी काँग्रेसची अहवाल बैठक, खासदार प्रतिभाताईंचे नेतृत्व
बातमी: चेतन लूतडे
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात झाली.
या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, मतदारसंघनिहाय रणनीती आखणे आणि घराघरात संपर्क मोहिमेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविणे या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात सक्रिय भूमिका पार पाडावी, बूथ समित्या अधिक कार्यक्षम बनवाव्यात आणि युवक व महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवावा, यावरही भर देण्यात आला.
यावेळी सरपंच श्रीमती मंजुषाताई मेरगुडे, श्री. संतोष रावत, श्री. घनश्याम मुलचंदानी, श्री. सोहेल रजा, श्री. प्रशांत भारती, श्री. के. के. सिंग, श्री. अनिल नरुले, श्री. नरेश जयस्वाल, श्री. बाळू चांदेकर यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment