समाजसेवेचे उद्दिष्टे हाती घेतलेले निष्ठावंत समाजसेवक मा.श्री.रवींद्र शिंदे .

समाजसेवेचे उद्दिष्टे हाती घेतलेले निष्ठावंत 
समाजसेवक मा.श्री.रवींद्र शिंदे .

"सारा अंधारच प्यावा ,अशी लागावी तहान
व्हावे एवढे लहान की,सारी मने कळु यावी 
लाभावा असा जिव्हाळा ,की पाषाणाची फुले व्हावी "
==========================
13 ऑक्टोबर 2025
मा.श्री.रवींद्र शिंदे यांचा वाढदिवस
सुप्रसिद्ध लेखक... अशोक पवार यांचा विशेष लेख
फोटो सुप्रसिद्ध चित्रकार...सुदर्शन बारापात्रे
==========================
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बळीराजाचे जीवन संकटात आले आहे अशा परिस्थितीत वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मा.रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी  घेतला आहे दरम्यान या दिवशी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकापर्यंत मदत पोहोचली जाणार आहे.सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वेळ आहे समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी कृती करणे हिच खरी सेवा असल्याचे मा.रवींद्र शिंदे यांनी सांगितले...
==========================
कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेंमुर्डे यांच्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

गोरगरिबांना मोलाचे सल्ले देण्यापेक्षा मदत महत्त्वाची असते. एक हात मदतीचा लाख पटीने असतो मोलाचा.गोरगरिबाची बाजू समजून घेणारे लोकसेवक,लोकसेवेची जान असणारे समाजसेवक, राजकारणाला समाजकारणाची जोड देणारे राजकीय नेते कमी आणि समाजसेवक जास्त असणारे मा. श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे हे एक व्यक्ती म्हणून जेवढे उंच आहे तेवढेच माणूस म्हणून उंच आहे...
            आपण इतिहास जर बघितला तर राजकारणी लोक जनसेवक होताना दिसत नाही.डोळ्यावर राजकारणाचा चष्मा लावून वावरतात. लोकांनाही ते आपले वाटत नाही.म्हणून लोक राजकीय नेत्याबद्दल चांगले बोलताना दिसत नाही...
          परंतु चंद्रपूर जिल्हात युवा नेते मा. श्री रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे राजकारणी असले तरी त्यांनी आपल्या डोळ्यावर समाजसेवेचा चष्मा लावून घेतलेला आहे.असे समाजसेवेचे वृत्त हाती घेतलेल्या समाजसेवकाच्या सानिध्यात गेल्या 25 वर्षे लेखक म्हणून राहण्याचा योग मला आला. त्यांचा जवळचा सहवास लाभला. मी अमरावती जिल्ह्यात मजुरी करत होतो.कामानिमित्त चंद्रपुरात आलो काही दिवस पडोलीला कोळसे फोडायचे काम केले.दोन वेळेची जेवणाची सोय सुद्धा नव्हती आणि पदरात दोन मुलं होती...बँकेत तुटपुंज्या मानधनावर काम करू लागलो. तेव्हा मा.रवींद्र श्रीनिवासराव शिंदे बँकेचे संचालक होते. त्यांच्या सहवासात आलो. आणि घनीष्ठ संबंध झाले.त्यांनी अध्यक्ष असताना मला बँकेत जवळ घेतले.आणि माझे आयुष्य उजळून निघाले.मा.श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे हे माझ्यासाठी परीस आहेत.मी त्यांच्या सानिध्यात गेलो आणि माझ्या जीवनाचे सोने झाले.माझे कुटुंब उभे झाले.माझ्या मुलाला शिक्षण घेत आले. एक मुलगा एमबीबीएस झाला.पुढे माझ्यासारख्या लेखकाला लेखनाची संधी मिळाली.आणि मी लिहली जवळजवळ 22 पुस्तके. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध साहित्यिक संस्थांनी मला 43 पुरस्कार देऊन सन्मानित केले.साहित्यात बस्तान बसले.माझी पुस्तक वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत 22 लोकांनी माझ्या पुस्तकावर वेगळ्या विद्यापीठातून एम. फील.,पीएचडी केली आहे.मातीमोल होणारे आयुष्य मा.श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी मला मदतीचा हात देऊन आयुष्य सोन्याचे बनवले. माझ्या घरात एकच फोटो आहे तो मा.रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांचा फोटो आहे.माझी मुलं त्यांना देवता मानतात.तसा मी बिराडचा लेखक असल्यामुळे नोकरीसाठी अनेक राजकीय नेत्याकडे फिरलो...काहीजण चांगले बोलले,काहींनी सल्ले दिले,काहीनी हाकलून दिले... पण कुठलाही जाती पातीचा नात्यागोत्याचा दूरवर काही संबंध नसताना माझ्यासारख्या लेखकाला उभे करणे, जवळ घेणे हे माझ्यासाठी ऐतिहासिक घटना आहे.मागे वळून पाहताना मा.श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्यामुळे आयुष्य सोने झाले.आता आयुष्य उतारवयाकडे झुकले.राजकारणात फार मोठी ताकत असते. राजकीय नेत्याकडे टोकाचा आणि शेवटचा गोर गरीब घटकातला माणूस ओळखण्याची ताकत असली पाहिजे. गोरगरीबाच्या गरजा छोटया छोट्या असतात. सर्व गरजा तर पूर्ण करता येणार नाही. पण काही गरजा तर नक्कीच पूर्ण करता येतात हे जर राजकारण्यांनी हाती घेतले थोडा समाज सेवेचा चष्मा लावून घेतला तर देश सुजलाम सुफलाम होयला वेळ लागणार नाही. हे कार्य संविधानासी नाते सांगते हे कार्य राष्ट्र उभे करण्या एवढे मोठे नक्कीच आहे...
गेल्या पंचवीस वर्षापासून श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे सहकारात कार्य करतात पंचवीस वर्षापासून संचालक तीन वेळा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत गेल्या 25 वर्षापासून त्यांनी बचतगटाबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे...त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बचत गट चळवळ नव्या जमाने पुढे आली आहे... सहकारातील सर्व कार्यकर्त्यांशी बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असले तरी बँकेच्या प्रशासनाबद्दल त्यांचे भूमिका अतिशय स्पष्ट ठाम आहे...ते कायद्याचे बाबतीत अतिशय कडक आहेत... 
          जात,धर्म,पंथ,असा भेदाभेद न करता सर्वांसाठी  समान कायदा व सर्वांचे समान हित जोपासण्याचे त्यांची भूमिका आहे...
      गोरगरीब बांधवाना न्याय  मिळावा समाजसेवा करता यावी म्हणून मा.रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर येथे स्थापना केली आहे...
सदर ट्रस्ट मधून नेहमी लोकांची सेवा करताना दिसतात ट्रस्टचे कार्य अहोरात्र सुरू आहे राजकारण आणि समाजकारण यांची त्यांनी अशी घुसळन केली तरुण वयातच ते जनसेवक झाले असे म्हटल्यास वावगे करू नये....
         आपण त्यांच्या समाजसेवेच्या गोष्टीचा अभ्यास केला ते सांगितले पाहिजे राजकीय नेता म्हटले की लोक सर्वांना एकाच नजरेने बघतात तशी आपली सर्वांची भावना झालेली आहे... पण आपण उघड्या डोळ्यांनी बघितल्यास मा. श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे सारखा समाजसेवी राजकीय नेता भेटतो २० टक्के राजकारण आणि 80% समाजकारण करणाऱ्या समाजसेवकांची नोंद आपल्यासारख्या कलावंतांनी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांच्या मानवी मूल्यांचे भान असणारे लोकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काम केल्यास जनसामान्याचे भले होऊन गोरगरिबांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या ह्याच कार्याची नोंद घेऊन मी ''गावखोरी''कादंबरी त्यांना समर्पित केली आहे स्वर्गीय श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल श्री रवींद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट द्वारे थोर पुरुषांच्या,समाजसेवकांच्या नावाने पुढील समाज उपयोगी योजना सुरू केलेले आहेत .
1) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना 
2) वेदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती योजना 3) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र उपक्रम 4) स्व.बाबा आमटे आरोग्य अभियान 5) हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना 6)डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना 7) आनाथाची माई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना 8)कै.मना पावडे क्रीडा स्पर्धा...
त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका बऱ्याच ठिकाणी सुरू केलल्या आहेत... आता गाव तेथे अभ्यासिका हा कार्यक्रम ते राबवित आहेत...वेदेही सद्गुरु श्री संत जगनाथ महाराज जनजागृती योजनेतून त्यांनी जवळपास 800 शिबिर घेतलेली आहे... यातून संतांचे व युगपुरुषांचे परिवर्तनवादी विचार त्यांनी जन माणसात रुजविले आहेत...
         डॉ बाबासाहेब आंबेडकर योजनेतून कायदे विषयक  मार्गदर्शन अनेक शिबिरातून मान्यवरांना बोलवून त्यांनी दिले...हिंदुऱ्हदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजनेतून त्यांनी ट्रस्ट मार्फतीने अनेक उपक्रम घेऊन दिव्यांगाना सायकली वाटप केल्यां...श्रदेय बाबा आमटे आरोग्य अभियानात गावोगावी अभियान घेऊन आरोग्य विषयक  विशेष सेवा पुरविल्या...
            स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांचे पाल्य दत्तक योजनेत जवळजवळ 200 मुलं दत्तक घेऊन मदत करीत आहे ते मुले पुणे कोकण आणि विदर्भातली आहे.मा.श्री रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या स्वतःच्या पत्नीला कोरोना झाला त्यात त्यांना भयावह अनुभव आला.कोरोना काळ म्हणजे महाभयंकर महामारीचा काळ या काळात आईला लेकरू पारख झालं होतं कोणी कोणाचे नव्हते.एखादा माणूस मेला तर त्याच्या मदतीला कोणी येत नव्हते.पैसे असूनही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हते अशा अतिशय महाकठीण काळात मा.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी आपले शिंदे मंगल कार्यालय आरोग्य सुख सुविधा सह उपलब्ध करून दिले...
           यवतमाळ वर्धा व चंद्रपूर या तीन जिल्ह्याच्या भागातून पेशंट मंगल कार्यालयात भरती झाले. मंगल कार्यालयाला मोठ्या हॉस्पिटलचे स्वरूप आले होते त्यांनी माणसे जिवंत ठेवण्याचे महान कार्य केले आजु बाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविल्या कोरोना काळात 6500 लोकांना मदत केली...
           मी मांडत गेलो तर हे पुस्तक तयार होईल. हे फक्त त्यांच्या कामाची वरवरची माहिती आहे.सोबत दिलेल्या आठ योजना विविध उपक्रम राबविली जातात जी कामे राष्ट्रपुरुषांनी महामानवांनी संतांनी केली
तिच कामे मा. रवींद्र श्रीनिवासराव शिंदे करीत आहे.त्यांच्या जनकार्याची इतरांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे.मा.श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे साताऱ्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिंदे,मालुसरे,मोरे या सरदारांना सुरळीत राज्यकारभार चालवा म्हणून वेगळी वतन दिली होती शिंधीया हे घरांनेही मूळचे शिंदेच हे शिंदे पेशवे काळात भारतभर राज्य कारभार करण्या साठी गेले... सल्लागार महदजी शिंदे यांच्याशी नाते जुळते त्याकरिता तेजसिंह शिंदे  भद्रावतीला त्यांच्या घरी येऊन गेलेले आहेत...
         राजघराण्याचा मोठा वारसा त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्या दारात कोणीही जा मदत मिळेलच...त्यांची सेवा 24 तास असते. बँकेचे अध्यक्ष व सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते समाजसेवेतील निष्ठावंत लोकसेवक आहेत.त्यांच्यासाठी कवितेच्या चार ओळी "सारा अंधारच प्यावा 
अशी लागावी तहान
 व्हावे एवढे लहान की,
सारी मने कळु यावी 
लाभावा असा जिव्हाळा 
की पाषाणाची फुले व्हावी "
आज मा. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
==========================
                                     अशोक पवार 
==========================
फक्त बातमी पोर्टल तर्फे श्री रवींद्र शिंदे (अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Comments