ओबीसी महामोर्चाने सरकारी जीआरचा निषेध केला; 'काळा जीआर रद्द करा'ची मागणीखासदार प्रतिभाताई धानोरकर आंदोलनात सहभागी.


 ओबीसी महामोर्चाने सरकारी जीआरचा निषेध केला; 'काळा जीआर रद्द करा'ची मागणी

खासदार प्रतिभाताई धानोरकर आंदोलनात सहभागी.

नागपूर, ११ ऑक्टोबर (वृत्तसेवा) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांतीच्या ऐतिहासिक भूमी असलेल्या नागपूर शहरात  'सकल ओबीसी महामोर्चा' संपन्न झाला. महायुती सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी आरक्षणासंदर्भात काढलेल्या सरकारी निर्णय (जीआर)चा तीव्र निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाद्वारे सरकारला हा 'काळा जीआर' तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला , यावेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपला सहभाग दर्शवला "मी खरी ओबीसी; समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक लढा देत आहे. शासनाचा हा जीआर म्हणजे ओबीसी समाजाच्या मुलभूत हक्कांवर आणि आरक्षणाच्या अधिकारावर झालेला जाणीवपूर्वक आघात आहे."

महामोर्चादरम्यान घेण्यात आलेल्या ठरावात सरकारकडे स्पष्टपणे मागणी करण्यात आली की, राज्य सरकारने हा काळा जीआर रद्द करून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना तातडीने करावी व त्यावर आधारित आरक्षण देण्यात यावे. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होईपर्यंत त्यांचा लढा अखंड सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

मा.आ. श्री. सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. 
त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या हातून समाजाची अखंड सेवा घडावी अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या. यावेळी श्री. रामू तिवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments