वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

अध्यक्ष शिंदे यांचा सत्कार, केंद्र व राज्य शासनाच्या योजना युवकांनी राबवाव्यात.

अध्यक्ष शिंदे यांचा सत्कार,  केंद्र व राज्य शासनाच्या योजना युवकांनी राबवाव्यात. 

चेतन लूतडे 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा संस्था सचिव युनियन व्दारा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्था सचिव युनियनचे अध्यक्ष हेमंत लोडे, उपाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव प्रभाकर हनवते यांसह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या प्रसंगी मा. शिंदे यांना दिलेल्या प्रेमादर आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.

या निमित्ताने युनियनच्या सदस्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान, शिंदे यांनी युवकांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सांगितले की, युवकांनी व्यवस्थित आर्थिक नियोजन करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी युनियन सदस्यांना दिले.

या कार्यक्रमात इतर अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
*****************
आमदार करन देवतळे यांचे पथसंंचालनात सहभाग 

           एहेतेशाम अली यांचा काँग्रेस प्रवेश

 माढेळी येथे बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटनप्रसंगी 
आमदार करण देवतळे यांची भेट.


Comments