सीतारामपेठ येथे वाघाचा आतंक; पाळीव जनावरांचा बळीगावकऱ्यांचे वनविभागाला निवेदन ; 'नरभक्षकाला लवकर जेरबंद करा'
गावकऱ्यांचे वनविभागाला निवेदन ; 'नरभक्षकाला लवकर जेरबंद करा' .
जाहिरात
मोहर्ली, भद्रावती : सीतारामपेठ बिट परिसरात वाघाचे सततचे हल्ले आता गंभीर झाले असून गेल्या सहा महिन्यांत एका माणसासह अनेक पाळीव जनावरे बळी पडली आहेत. गावात आताचे दहशतीचे वातावरण आहे. ग्रामसभेकडून वन विभागाला नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माणूस ठार, पाळीव जनावरे बळी : गेल्या शुक्रवारी दिनांक २४ सप्टेंबर रोजी सीतारामपेठ बिट परिसरात श्री. अमोल नन्नावरे (राहतो भामडेळी) हे शेतात जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना गावकरीयांमध्यी कोणतीही कारवाई न झाल्यास भविष्यात अशाच घटना घडणार याची भीती निर्माण करणारी आहे. मागील सहा महिन्यांत या परिसरात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे ठार झाली आहेत. मोहर्जी-मुधोली मार्गावर मोटारसायकल सवारावर हल्ले झाल्याचेही नोंदवले आहे.
गावाजवळ सतत दिसतोय वाघ : केवळ मागील आठवड्यातच, दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी श्री. विठ्ठल भोयर यांची गाय वाघाने ठार केली. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता गावाजवळ रस्ता ओलांडत असताना वाघ गावकरीयांना दिसला. तर, सोमवारी सकाळीही गावाजवळ काम करणाऱ्या काही महिलांना वाघ दिसल्याचे सांगितले जाते. यामुळे महिला व पुरुष यांचे रोजगारासाठी किंवा शेतीकामासाठी बाहेर जाणे धोकादायक झाले आहे.
गावकरी वैतागले, कारवाईची मागणी : गावकरी सततच्या या हिंसक वाघाच्या त्रासामुळे वैतागले असून, वन विभागाला याबाबत अनेक वेळा माहिती दिली गेली तरीही योग्य ती कारवाई होत नसल्याचे ते सांगत आहेत. ग्रामसभा सितारामपेठकडून मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांना पाठवलेल्या पत्रात नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती करण्यात आली आहे. गावकरीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने वन विभागाकडून तातडीने यावर उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.
*********
Comments
Post a Comment