जुगारावर भद्रावती पोलिसांची कारवाई!*

*जुगारावर भद्रावती पोलिसांची कारवाई!*

*चंद्रपूर :-30/10/2025

  भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीतील चंदनखेडा जंगल झुडपी परिसरात काही ईसम पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती 27 आक्टोंबर रोजी मिळाली असता भद्रावती पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली, तेव्हा पोलिसांना पाहून काही पडून गेले.
तिन जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व 6 दुचाकी, असा एकूण 4 लाख,5 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपींविरुद्ध संबंधीत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बाकल,यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी,यांच्या मार्गदर्शनात पोहवा.गोपाल आतकुलवार,विश्वनाथ चुदरी,पोअं.रोहित चिटगिरे,संतोष राठोड,खुशाल कावळे इतरांनी केली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरातील विविध अवैध धंद्यांवर भद्रावती पोलिसांकडून धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू आहे.

Comments