महाराष्ट्रातील शेतकर्याची संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी .शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या,सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे
शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या,
सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे
वरोरा, दि. ३० ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्रातील शेतकरी नेते आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्याची तातडीची मागणी करतील.
अतिवृष्टी, पिकानुकसान, वाढत्या खर्चामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचा हवाला देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार बच्चू कडू, अॅड. वामनराव चटप, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले यांसारख्या प्रमुख शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित अनेक तातडीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
· संपूर्ण कर्जमुक्ती: महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी आणि सातबारा कोरा करावा.
· सोयाबीन खरेदीतील समस्या: सोयाबीनच्या ग्रेडिंगमध्ये A, B, C या श्रेणींमधील दरातील फरक फक्त ₹१०० ते ₹२०० इतका ठेवावा. किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात माल विकला जाऊ नये. सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने, १२% ओलाव्याची अट शिथिल करून खरेदी सुरू करावी.
· खरेदी केंद्रे सुरू करा: कापूस, सोयाबीन, धान यासारख्या शेतमालाची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागला, त्यांना ताबडतोब भावांतर योजनेचा लाभ द्यावा.
· कांदा उत्पादकांचे प्रश्न: कांदा उत्पादकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे.
· अतिवृष्टी मदत वाढवा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी दिली जाणारी तुटपुंजी रक्कम वाढवून, पंचनाम्याची अट रद्द करून, किमान दर हेक्टरी ₹५०,००० पर्यंत मदत द्यावी.
या पत्राद्वारे शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन सुरू आहे आणि त्याला त्यांचा पाठिंबा आहे. शेतकरीहितासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय तातडीने अंमलात आणावा, अशी विनंती दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या या निर्णायक लढ्याला वरोरा तालुक्यातील शेतकरी पुत्र व सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर डुकरे नागपूर येथे उपस्थित होते यानंतर आज गुरुवारी शेतकरी मित्रांनी आंदोलनाचा भाग म्हणून तहसीलदार व वरोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.
Comments
Post a Comment