भद्रावती - दिवाळीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी (भाजप) भद्रावती तालुका व शहर यांच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा श्री मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराजजी अहिर यांचे मार्गदर्शन लाभले.
या सोहळ्यात आमदार करणजी देवतळे, भाजप नेते डॉ. अशोक जिवतोडे, रविंद्र शिंदे, रमेश राजूरकर, अशोक हजारे, प्रा. धनराज आस्वले यांसह पक्षाच्या ग्रामीण व शहर शाखेचे अध्यक्ष, महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी प्रकोष्ठ तसेच भद्रावती महानगरपालिका व को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व वर्तमान पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे संचालन श्री विनोद पांढरे यांनी केले. श्री पाम्पट्टीवार यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहभोजनासह कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात झाली.
Comments
Post a Comment