खासदाराच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश भद्रावतीत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये मोठा प्रवेश, निहाल सिद्दिकी यांची माजरी शहराध्यक्षपदी नियुक्ती.


खासदाराच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश भद्रावतीत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये मोठा प्रवेश, निहाल सिद्दिकी यांची माजरी शहराध्यक्षपदी नियुक्ती

निहाल सिद्दिकी, श्री. सुधाकर कुंकुले, श्रीमती पुष्पा मेश्राम, रवी भोगे, यांचा काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

चेतन लूतडे

वरोरा शहरातील श्रीमती पुष्पा संभाजी मेश्राम, सुधाकर कुंकुले व त्यांच्या पत्नी यांनी आज काँग्रेस पक्षात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

 भद्रावती तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चार प्रमुख कार्यकर्ते श्री. रवी रॉय, श्री. रवी भोगे, श्री. मुन्ना वर्मा तसेच मा. निहाल सिद्दिकी यांनी आज शिवसेनेतून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी मा. निहाल सिद्दिकी यांची काँग्रेस पक्षाच्या माजरी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्षाला बळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास काँग्रेसचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मा. अहेतेशाम अली, श्री. राकेश दोंतावार, राजू महाजन, निलेश भालेराव यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments