चंद्रपूर : मोरवा येथील सहजयोग ध्यान साधना केंद्रात आज (दि. २६ ऑक्टोबर) परमपूज्य श्रीमाता जी निर्मला देवी महालक्ष्मी पूजन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले.
अत्यंत आध्यात्मिक, चैतन्यमय व ऊर्जामय वातावरणात ध्यान साधना, पूजन व प्रार्थना पार पडली. हजारोंच्या संख्येने साधकांनी उपस्थित राहून या पवित्र क्षणाचा लाभ घेतला. भक्तिमय आणि शांततेने नटलेल्या वातावरणात हा सोहळा आनंद, एकात्मता आणि आत्मिक उन्नतीचा संदेश देत यशस्वीरीत्या पार पडला.
या पूजन सोहळ्याला चंद्रपूरचे आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे, भाजप चंद्रपूर महानगराध्यक्ष श्री. सुभाषभाऊ कासनगोटुवार तसेच ध्यान साधना केंद्राचे पदाधिकारी व साधकवृंद उपस्थित होते.
या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भक्तांना आध्यात्मिक शांतीचा अनुभव आला असून, समाजात एकात्मता आणि भाईचारा वाढवण्यास हा कार्यक्रम उपयुक्त ठरला आहे.
Comments
Post a Comment