वरोऱ्यात आईचा जागर कार्यक्रम.इंडियन आयडॉल फेम वैशाली रायकवार उपस्थित राहणार



वरोऱ्यात आईचा जागर कार्यक्रम.
इंडियन आयडॉल फेम वैशाली रायकवार उपस्थित राहणार

वरोरा : 
खांजी वॉर्डातील झोपला मारुती देवस्थानच्या वतीने २५ ऑक्टोबर शनिवारी  आईचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्य गायिका म्हणून इंडियन आयडॉल फेम वैशाली रायकवार उपस्थित राहणार आहेत. त्यांना नंदू ताम्रकार आणि संच साथ देणार आहे.
या कार्यक्रमाचे अँकरिंग परेश गुल्लाटी यांच्या वेशात करणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलामुलीकरिता वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना पाच, तीन, दोन हजार रुपये अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मनीष जेठाणी यांनी केले आहे.

************

Comments