आष्टा घाटातील अवैध वाळू तस्करीच्या ट्रॅक्टरने तरुण मिस्त्रीचा मृत्यू .पोलीस अधिकारी कांबळे यांच्याकडे प्राथमिक तपास.
पोलीस अधिकारी कांबळे यांच्याकडे प्राथमिक तपास.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा : शेगाव , आष्टा घाटाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या एका दुःखद अपघातात नेरी खांबाळा येथील एका तरुण मिस्त्रीचा मृत्यू झाला. मृतक प्रमोद रामभाऊ शेरकुरे (वय ३४) यांचा मृत्यू अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातात झाल्याचे शेगाव परिसरातील नागरिकांनी सांगितले. या घटनेने आष्टा नदी घाटावर चालणाऱ्या वाळूच्या अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
घटनेचा क्रम
माहितीनुसार, प्रमोद शेरकुरे आणि त्यांचे वडील रामभाऊ शेरकुरे हे मूळचे नेरी खांबाडा (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असून, शेगाव येथील मृतक बहिणीच्या घरी राहून मिस्त्रीचे काम करत. दादापुरला घरकुल बांधण्याचे काम मिळाले होते. ते संपल्यानंतर सुमारे पंधरा दिवस काम नसल्याने ते शेगावला बहिणीच्या घरी राहत होते.
या दरम्यान, २१ तारखेला मंगळवारी रात्री अंदाजे आठ वाजता च्या सुमारास प्रमोद शेरकुरे हे बहिण कांताबाई यांच्या घरी जेवण करत होते. तेवढ्यात पियुष चौधरी नावाच्या व्यक्तीने त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवले आणि आष्टा घाटावर रेती भरण्याच्या कामासाठी लाल रंगाचा विवो ट्रॅक्टर मालकाचे बोलावणे आले असल्याचे सांगून नेले. हे ट्रॅक्टर सध्या दुसऱ्या मालकांनी किरायाने घेतले असल्याने रात्री जास्तीत जास्त वाळूच्या ट्रीप मारण्यासाठी मजूर लागत असल्याने या तरुण मिस्त्रीला नेण्यात आले. अनुभव नसल्याने या तरुण मिस्त्रीचा दुर्दैवी अंत झाल्याचे कळले .त्यावेळी प्रमोदचे वडील रामभाऊ शेरकुरे काम नसल्यामुळे गावी गेले होते.
अपघातानंतरची घडामोड
रात्री अंदाजे बारा वाजता रामभाऊ शेरकुरे यांच्याकडे फोन आल्यानंतर ते तात्काळ शेगावला पोहोचले. तेव्हा त्यांना पुत्राच्या मृत्यूची दुःखद वार्ता कळली. या घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक नंदकिशोर दडमल यांनी शेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर मनोज दडमल, नंदेश्वर दडमल आणि पियुष चौधरी यांनी पोलिसांच्या समक्ष प्रमोदचे शव त्याच ट्रॅक्टरमध्ये ठेवले. आणि ते शेगाव पोलिस स्टेशनवर आणले. तेथून रात्रीच अंदाजे बारा- एक वाजता सुमारास एम्बुलन्स मध्ये शव वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
वाळू तस्करीशी नाते?
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, कारेगाव समोरील आष्टा नदी घाटावर मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक रात्रीच्या वेळी केली जाते. कोणत्याही अधिकाऱ्याची भीती नसल्याने वाळू तस्कर रात्रभर मोठ्या प्रमाणात वाळू ट्रॅक्टरने वाहत असतात. असेच वाळू वाहून नेण्याच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर वाळू तस्करांनी आष्टा घाटाच्या काठावरच प्रमोदचे शव ठेवले आणि ते ठिकाणाहून पळून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व वाळू तस्करांवर कारवाई होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलिस तपास चालू
प्रमोद रामभाऊ शेरकुरे यांच्या मृत्यूचा अपघात आहे की इतर काही, याचा तपास शेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस ठाणेदार यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तसेच, घटनास्थळी वाळू तस्करीचा दावा केला जात असल्याने, या बाबतीतही पोलिस आगामी कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
शेगाव येथील पोलीस अधिकारी कांबळे यांना विचारणा केली असता अजून पर्यंत मृत्यू कशाने झाला आहे हे पोस्टमार्टम झाल्यानंतर कळेल असे सांगण्यात आले.
--------
Comments
Post a Comment