चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अहेतेशाम अली यांची नियुक्ती

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अहेतेशाम अली यांची नियुक्ती

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी अहेतेशाम अली यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

सुभाष धोटे यांनी सांगितले की, "अहेतेशाम अली यांनी सामाजिक कार्यात नेहमीच धडाडीने काम केले असून काँग्रेस पक्षाची संघटना बांधण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांबाबत जागरूकतेने कार्य केले आहे. त्यांचे कार्यकौशल्य लक्षात घेता त्यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच उपयुक्त ठरेल. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी जोमाने प्रयत्न करावे, अशीच अपेक्षा केली आहे."
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदावर अहेतेशाम अली यांची नियुक्ती झाल्याबद्दल खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांसह समस्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

अली यांनी दिवाळी सणानिमित्त सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन केले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे वचन दिले.

Comments