वरोरा : वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे चंद्रपूरला -नागपूर महामार्गांवर मुख्य मागणी धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजेत याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धनगर समाजाची आरक्षण ची अंमलबजावणी करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गा मध्ये समाविष्ट करणे, शेळ्या मेंढयाना चराईसाठी वनविभाग आरक्षित जागा देणे, अहिल्यादेवी होळकर महामेष योजना चालु करणे, यशवंतराव घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अश्या विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनात टेमुर्डा येथे हजारो च्यासंख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरले होतें. या दरम्यान रस्त्यावर बसून यळकोट यळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घोषणाबाजी करून काही वेळ चक्कजाम केला होता .
यावेळी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करून धनगर योजनेचा लाभ समाजाला मिळाला पाहिजेत.
आरक्षण अंमलबजावणी झाली नाही. तर सरकारच्या मागे धनगर समाज कधीच उभा राहणार नाही. या आंदोलनाचे ने्तृत्व आयोजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, धनगर समाज महासंघ, धनगर जमत संघटना, धनगर कर्मचारी संघटना, मल्हार सेना, अहिल्यावहिनी महिला सेना यांनी केले होतें. या आंदोलनात हजारो धनगर समाज उपस्थित होतें.
Comments
Post a Comment