जीवतोडे यांनी सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवले, शेतकऱ्यांचा निषेध.नापिकी आणि कर्जबाजारीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता.

जीवतोडे यांनी सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवले, शेतकऱ्यांचा निषेध.

नापिकी आणि कर्जबाजारीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता. 

आजारी कृषी विभागालाच उपचाराची गरज.

वरोरा 
चेतन लूतडे 

नंदोरी (भद्रावती). सोयाबीन पिकाची दयनीय स्थिती पाहून शेतकऱ्यांनी रोटावेटर चालवून स्वतःचेच पीक नष्ट केले. उद्योजक शेतकरी नरेंद्र जिवतोडे यांनी अकरा एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवून शासनाचा निषेध व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ८० टक्के सोयाबीन पीक नष्ट झाल्याचा अंदाज आहे.
सोयाबीन पिकावर त रोटावेटर चालवले, शेतकऱ्यांचा निषेध.

भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावात बुधवारी सकाळी एक दृश्य अनोखे होते. शेतकरी नरेंद्र जिवतोडे यांनी आपल्याच शेतातील अकरा एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवून ते पूर्णपणे नष्ट केले. ही कृती त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली. याद्वारे त्यांनी सोयाबीन पिकाच्या नाशाबद्दल शासनाकडे झालेल्या दुर्लक्षावर मुकाट निषेध व्यक्त केला.

अनेक कारणांचे सोंग, बियाण्यावर शंका

या वर्षी मुसळधार पाऊस, मूळकूज-खोडकूज, हॅलो मोजाक, बुरशी अशा अनेक कारणांमुळे सोयाबीन पीक खराब झाल्याचे सांगितले जाते. मात्र, श्री. जिवतोडे यांच्या मते, महाराष्ट्रातील सोयाबीन बियाणेचीच गुणवत्ता खराब आहे. त्यांनी कृषी केंद्रातून विकत घेतलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बियाण्यापासूनचे पीक खराब झाले, 
तर कृषी विभागाच्या पी के व्ही अंबा डेमो प्लॉटमधील पीक चांगल्या स्थितीत आहे, यावरून शेतकऱ्यांच्या बियाण्यावरच शंका व्यक्त केली जात आहे. सरकारने आपल्या देखरेख खाली स्वतःच्या कृषी विभागातून
शेतकऱ्यांना अद्यावत बियाणे द्यावीत. व वेळोवेळी पिका संबंधित सूचना प्रसारित करावे.
कृषी विभागा मार्फत हा सगळा प्रकार नाममात्र करण्यात येत असल्याचे मत आहे.

हेक्टरी साठ हजार रुपये नुकसान, नुकसान भरपाई 8000रू. , शासनाची उदासीनता

श्री. जिवतोडे यांना फक्त या पिकामुळे सुमारे हेक्टरी साठ हजार रुपये एवढे नुकसान सोसावे लागले आहे. शासन याबद्दल फक्त आठ हजार रुपये नुकसानभरपाई देत आहे. विमा कंपन्यादेखील फारच कमी रक्कम भरपाई म्हणून देत आहेत. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हा सगळा काळा बाजार उघडपणे चालू आहे.
जिल्हा दुष्काळग्रस्त नाही, कृषी विभागाची निष्क्रियता

कृषी विभागाने वेळेवर आकडे जमा केले नसल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट झाला नाही. आता समावेश झाला तरी शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल याची शाश्वती नाही. सध्या, सोयाबीन नंतर येणाऱ्या चनापिकाची शेतकऱ्यांना काळजी वाटू लागली आहे. बुरशीचा रोग सोयाबीननंतर चनापिकालाही बाधीत करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कृषी विभाग शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या सर्व समस्यांमुळे नंदोरीपरिसरातील इतर शेतकऱ्यांनीही आपले सोयाबीन पीक रोटावेटरने नष्ट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. खऱ्या अर्थाने कृषी विभागच आजारी असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

दिवाळीपर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे टाकावे व सरसकट कर्जमाफी करावी.अन्यथा मोठ्या प्रमाणात आत्महत्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
******

Comments