चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय.. सहन करणार नाही !!खासदार प्रतिभाताई धानोरकर. जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर.
जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे.
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात झालेला निसर्गाचा कहर, अतिवृष्टीने अक्षरशः उद्ध्वस्त झालेला शेतकरी... अशी भीषण परिस्थिती असताना महायुती सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत न करता वाऱ्यावर सोडलं आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आले होते. या विरोधात लढून, जोरदार पाठपुरावा करून मी चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यास सरकारला भाग पाडले. त्यातही आता जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्याला मिळणारी सावत्र वागणूक, केवळ नकारात्मक भावनेतून स्वतःच्या तालुक्यावरही अन्याय करण्याची त्यांची मानसिकता आपल्या लक्षात येते. या अन्यायाचा, या मानसिकतेचा निषेध करण्यासाठी, सरसकट कर्जमाफीचा शब्द सरकारने पूर्ण करावा या मागणीसाठी आज गोंडपिंपरी येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात व माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
मुळातच राजुरा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी करून हे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांची सरकारला कदर नाही हे सत्य आहे. मात्र सरकारच्या या अन्यायकारक धोरणांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. आज आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले हजारो शेतकरी, विद्यार्थी, महिला व सर्वांनी एकमुखाने केलेला सरकारचा निषेध यावरून जनतेच्या मनात असलेला हा असंतोष प्रत्यक्ष रस्त्यावर दिसून आला. आपली लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या संघर्षाचे नेतृत्व करत मी यापुढेही आपल्यासाठी लढणार. ज्याप्रमाणे संघर्ष करून मदतीच्या पॅकेजमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यास सरकारला भाग पाडले, त्याचप्रमाणे मी गोंडपिंपरी तालुक्याचाही समावेश करण्यासाठी लढणार हा विश्वास यावेळी व्यक्त केला.
आंदोलनात काँग्रेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह गोंडपिंपरी तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment