ताडोबा प्रवेशद्वारा जवळ जिप्सी प्रवेश बंद आंदोलन .खासदाराचे रौद्ररूप पाहून वनविभागाचे अधिकारी नरमले.
ताडोबा प्रवेशद्वारा जवळ जिप्सी प्रवेश बंद आंदोलन .
खासदाराचे रौद्ररूप पाहून वनविभागाचे अधिकारी नरमले.
चेतन लूतडे , चंद्रपूर
चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेश शुल्कवाढीविरोधात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात "जिप्सी प्रवेश बंद" आंदोलन तीव्र करण्यात आले.
मोहर्ली मुख्य प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनात स्थानिकांना अन्यायकारक भारातून मुक्तता मिळावी, हा ठाम आवाज बुलंद करण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्याची ओळख व अभिमान असलेल्या ताडोब्यातील वाढीव शुल्कामुळे स्थानिकांना व्याघ्र प्रकल्पाचे सौंदर्य अनुभवणे कठीण बनले होते. प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर जनआक्रोशाने उग्र आंदोलनाचा मार्ग धरला.
आंदोलनाला स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या त्यागामुळे प्रशासन नरमले आणि ताडोबा व्यवस्थापनाने पुढील आठ दिवसांत स्थानिकांसाठी प्रवेश शुल्कात सूट दिली जाईल, अशी ग्वाही दिली.तथापि, हे आश्वासन पूर्ण न झाल्यास आणखी व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी झालेल्या चंद्रपूरकर, काँग्रेस कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना खासदार धानोरकर यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
**********
Comments
Post a Comment