वीज कंत्राटी कामगारांचा आंदोलनास पाठिंबा.

 
  वीज कंत्राटी कामगारांचा आंदोलनास पाठिंबा.

राज्याच्या वीज उद्योगातील कायम कामगार हे 9, 10 व 11 ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय संप करणार आहेत या संपास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश तसेच चंद्रपूर झोन कार्यकारिणीने पाठिंबा जाहीर केला.
राज्यातील 42000 वीज कंत्राटी कांमगारांच्या विविध प्रलंबित व सद्य स्थितीमध्ये भेडसावत असलेल्या अनेक समस्यांचे पत्र मा.ऊर्जामंत्री, शासन व प्रशासनास देऊन देखील अद्याप संघटनेला चर्चेला बोलावले नाही.चर्चा व संवादातून समस्यां सुटतात त्यामुळे राज्यातील सर्व कंत्राटी कामगार देखील 9  तारखेला काळी फित लावणार असून दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता द्वार सभा घेऊन आपले कामबंद आंदोलन सुरू करतील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अंकुश डोंगरवार यांनी दिली.

राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नक्कीच योग्य तोडगा काढून त्यांच्या खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमराज गेंडे यांनी  व्यक्त केली.

Comments