शेतकरी नेते आदरणीय श्री.वामनराव चटप यांनी शिंदे यांना दिले आशीर्वाद.

शेतकरी नेते आदरणीय श्री.वामनराव चटप यांनी शिंदे यांना दिले आशीर्वाद. 


चंद्रपूर - चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रवी शिंदे यांची येथे माजी आमदार वामनराव चटप आणि मारुती बोथले यांची भेट झाली. या प्रसंगी माजी आमदारांनी बँकेच्या अध्यक्षांना 'ग्रामगीता'  भेट देऊन सत्कार केला.
या भेटीदरम्यान, बँकेने शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या कामांबद्दल माजी आमदार चटप यांनी शिंदे यांचे कौतुक केले व शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी काम चालू ठेवण्यासाठी आशीर्वाद दिले. यावेळी बँकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या बँकेमार्फत विविध योजनांतून शेतकऱ्यांना भरीव मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. शेतकरी आणि ग्रामीण समुदायाच्या उन्नतीसाठी बँक सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या भेटीत शेतकरी हिताच्या विविध योजना आणि सहकारी क्षेत्रातील संधींवर चर्चा झाली.

Comments