जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल

जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे  बाधितांना विशेष मदत पॅकेज  व सवलती घोषित 

चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल 

चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेच मोर्चा आंदोलने आणि सरकारला निवेदन दिल्यानंतर नऊ सप्टेंबरला आलेल्या सरकारच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  थोडा दिलासा मिळणार असून स्थानिक आमदार करण देवतळे यांनी सरकारचे आभार मानले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात  अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिक नुकसान, शेतजमीन  खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे । बाधित / तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरविण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन द्वारे करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते  सप्टेंबर २०२५ या कालावधीत २५३ तालुक्यामधील शेतीपिक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक  व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना / आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिशिष्ट अ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांना ही मदत मिळणार असल्याचे आदेश सरकारतर्फे जारी करण्यात आले आहे.
*********************

Comments