अति पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कापूस-सोयाबीनचा नाश, शेतकरी आंदोलनात उतरलेअति पावसामुळे मूळसड आणि खोडसड चा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच..
अति पावसामुळे मूळसड आणि खोडसड चा प्रादुर्भाव
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच..
वरोरा
चेतन लूतडे
चंद्रपूर: अलीकडील अति पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टरवर पेरणी केलेले कापूस आणि सोयाबीन या पिकांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे. मूळ सड आणि खोडसड या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या समस्येने शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला आहे.
अति पावसामुळे शेतात पाणी साचल्याने मूळ सड आणि खोडसड सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा परिणाम म्हणून कापूस पिकावरील फुले गळू लागली आहेत तर सोयाबीनचे पीकही बाधित झाले आहे. शेतकरी सांगतात की, पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्या हातात आलेले पीक खराब झाले आहे.
या परिस्थितीमुळे नितीन मते आणि किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन उभारले होते. या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत मोठ्या ताकदीने नेण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
सध्या, शेतकरी शासनाकडून योग्य तो मदतीचे पॅकेज आणि दुष्काळग्रस्त जिल्हा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाला असला तरी, अद्याप त्यांच्या मागण्यांचे निराकरण झालेले नाही.
नितीन मत्ते जिल्हाप्रमुख शिवसेना
आम्ही सरकारमध्ये असून सुद्धा आंदोलन करावे लागत आहे. सरकारने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून वगळला याची काही निकष असतात. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मूळसड आणि खोडसड या प्रादुर्भाव मुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत सर्वे करावा. व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
Comments
Post a Comment