ठेवीदारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष शिबिर, 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवींचा परतावा

ठेवीदारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात विशेष शिबिर, 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवींचा परतावा

चंद्रपूर, २३ ऑक्टोबर (वृत्त) : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये सुमारे ८८ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा परतावा ३ लाख ७६ हजार २४२ खातेदारांना देण्यासाठी उद्या, २४ ऑक्टोबर रोजी एक विशेष जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या शिबिरातून ठेवीदार किंवा त्यांचे वारस यांना त्यांच्या न मिळालेल्या ठेवींचा दावा सादर करता येईल. जिल्हा प्रशासनाकडून सर्व संबंधित ठेवीदारांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांपर्यंत दावा न केलेल्या ठेवींची माहिती पोहोचवून, त्यांना त्यांचे पैसा परत मिळण्यास मदत करणे हा आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांनाही या ठेवींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास सांगितले आहे.

Comments