देवेंद्र सरकारने जिल्ह्यासाठी निधी दिला असून 80 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले आहे.

देवेंद्र सरकारने जिल्ह्यासाठी निधी दिला असून 80 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांनी विरजन टाकू नये. 

गोंडवाना गणतंत्र चे माजी जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांचा भाजप पक्ष प्रवेश.

वरोरा 29/10/2025
चेतन लूतडे 

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी बाधितांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते.जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते.
या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नष्ट झाल्याचे, शेतजमीन खराब झाल्याचे, मनुष्यनुकसान झाल्याचे तसेच घरे कोसळल्याचे प्रकार घडले होते. सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
त्यासाठी शेतकऱ्यांना 8500रू. हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली होती. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली असून उर्वरित रक्कम तांत्रिक कारणामुळे सातबारा वरचे नावे, किंवा चुकीचे अकाउंट नंबर,  केवायसी नसल्याने बँकेच्या खात्यामध्ये थांबली असल्याचे मत चंद्रपूर जिल्ह्याच्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे काम भाजप नेत्याचे आहे. नेत्यांच्या  प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्तेनी खूप मेहनत घेतली. भाजपाचे सरकार बसवले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी . गटातटाचे राजकारण दूर ठेऊन इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज भाजप कार्यालयात  भरून घ्यावे. सर्वे झाल्यानंतर योग्य उमेदवारास भाजप पक्ष उमेदवारी नक्की देईन असे ठाम मत पालकमंत्र्यांनी मांडले.
भाजप पक्षात पंधरा मिनिटांपूर्वी प्रवेश घेतलेला कार्यकर्ता आणि पंधरा वर्षे पासून काम करत असलेला भाजप कार्यकर्ता सारखाच आहे. भाजप पक्षापेक्षा कोणताही नेता मोठा नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल. पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून सर्वजण काम करत आहे. त्यामुळे लहान मोठा असा फरक न मानता पक्ष वाढीसाठी आणि देवेंद्र सरकार मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सरकारने दिलेली मदत जनतेपर्यंत पोहोचवावी. नागरिकांची कामे होत नसल्यास माझ्याशी संपर्क साधावा. अशा बऱ्याच सूचना भाजप कार्यकर्त्यांना पालकमत्र्यांनी दिल्या. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्यासाठी भाजप पक्षातर्फे मोर्च बांधणी सुरू आहे.
--------
पालकमंत्री अशोक उईके , आमदार करन देवतळे, बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजप नेते राजुरकर यांची उपस्थित रमेश मेश्राम यांचा जाहीर पक्ष प्रवेश.

वरोरा येथील विश्रामगहामध्ये पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते माजी गोंडवाना गणतंत्र चे जिल्हाप्रमुख तथा माझी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांचा भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश घेण्यात आला. भाजप पक्षाच्या विचारसरणीला प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाज बांधव पक्षाला मजबुती प्रदान करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप नेते आमदार करन देवतळे, निवडणूक प्रमुख  वरोरा विधानसभा तथा राज्य परिषद सदस्य भाजप रमेश राजुरकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय देवतळे, सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments