राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवात रवींद्र शिंदे व जयंत टेंमुर्डे यांचा सत्कार.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवात रवींद्र शिंदे व जयंत टेंमुर्डे यांचा सत्कार. 

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयंत टेंमुर्डे यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मंडळाचे सर्वाधिकारी माननीय लक्ष्मणराव गमे यांच्या हस्ते या दोन्ही कार्यकर्त्यांचा पुरस्कार व सत्कार करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना' सुरू करण्यात आली आहे. तसेच, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सातत्याने सामाजिक कार्य चालविण्यात आल्याने रवींद्र शिंदे यांना या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी हा सन्मान केलेल्या कार्याची मोठी पोच आहे, असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोधे तसेच चंद्रपूर जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी रघुलाल कावडे उपस्थित होते.
बँक अध्यक्षांचा ऐतिहासिक निर्णय

रवींद्र शिंदे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला. बँकेमध्ये कामानिमित्त किंवा वैयक्तिक भेटीसाठी येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी भगवी टोपी व 'संस्कारक्षम ग्रामगीता' हा ग्रंथ देऊन करण्याचे त्यांनी ठरवले. तसेच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मृतीतिथीपासून 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना' सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.

या निर्णयामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यावरील आणि साहित्यावरील प्रेम व श्रद्धा प्रगट झाली आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने या ऐतिहासिक निर्णयाचे अभिनंदन करत १७ सप्टेंबर, २०२५ रोजी झालेल्या कार्यकारिणी सभेत एक ठराव पारित केला होता. यानुसार, ५ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान चाललेल्या पुण्यतिथी महोत्सव कालावधीत, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता गोपालकाल्याच्या प्रसंगी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, अमरावती येथे रवींद्र शिंदे व जयंत टेंमुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

Comments