भद्रावतीत रवींद्र शिंदे यांचे सामाजिक कार्यासाठी ऐतिहासिक आवाहन,13 ऑक्टोबरला विविध योजनेचे व गरजूंना मदत करण्याचे आव्हान.

भद्रावतीत रवींद्र शिंदे यांचे सामाजिक कार्यासाठी ऐतिहासिक आवाहन

13 ऑक्टोबरला विविध योजनेचे व गरजूंना मदत करण्याचे आव्हान.

चेतन लूतडे 

भद्रावती, 13 ऑक्टोबर 2025: राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी संकटात असताना स्वतःचा वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही, अशी भावना व्यक्त करून माजी अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी रवींद्र शिंदे यांच्या वतीने नऊ विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यातून समाजकार्याचे व्रत स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

रवींद्र शिंदे मित्र परिवारतर्फे जारी केल्या गेलेल्या आवाहनात म्हटले आहे:

वाढदिवसानिमित्त समाजकार्य: राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीत शोकाकुल परिस्थितीत रवींद्र शिंदे यांनी यावर्षी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता तो दिवस समाजकार्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयातून वेगवेगळ्या सामाजिक योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत, ज्याद्वारे सर्वसामान्यांना मदत करून सशक्त समाज घडविण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
13 ऑक्टोबर रोजी पुढील योजनांद्वारे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत:

· वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना
· विदेही सद्गुरू श्री संत जगनाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदे विषयक मार्गदर्शक उपक्रम
· श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान
· हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना
· डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना
· अनाथांची माई स्व. सिंदुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना
· कै. म.ना.पावडे क्रिडा स्पर्धा. असे वेगवेगळे उपक्रम यावेळी राबवण्यात येणार आहेत.

· 📅 दिनांक: 13 ऑक्टोबर 2025 (सोमवार)
· ⏰ वेळ: सकाळी 10:00 वाजता
· 🏠 स्थळ: श्री मंगल कार्यालय, भद्रावती 
· 🎯 उद्देश: स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरेटिबल ट्रस्ट चंद्रपूर या उपक्रमांतर्गत गरजूंना मदत करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे संपर्क करावा.


*********

Comments