चंद्रपूर जिल्हा मदत निधीच्या यादीतून वगळला; पालकमंत्री अशोक उईके यांच्या पाहणीदौऱ्यात शेतकऱ्यांचा रोष

चंद्रपूर जिल्हा मदत निधीच्या यादीतून वगळला; पालकमंत्री अशोक उईके यांच्या पाहणीदौऱ्यात शेतकऱ्यांचा रोष

चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज वरोरा तालुक्यातील मौजे चारगाव-भेंडाळा येथे पालकमंत्री अशोक उईके यांनी जिल्ह्याच्या खासदार म्हणून पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकल्या. शेतकऱ्यांनी सरकारच्या मदत निधी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश न होणे अन्यायकारक ठरल्याचा आरोप केला.

गेल्या महिन्याभरापासून सततच्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी जाहीर केला असला, तरी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही.

या प्रसंगी बोलताना शेतकरी नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भरभरून मते मिळवली, पण आता संकटाच्या वेळी सरकारने मदत निधीतून त्यांना वगळले आहे. एकीकडे मते मिळवणे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना संकटात सोडून देणे ही दुटप्पी नीती आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक उईके यांनी या विषयावर शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने मदत निधीच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे.

शेतकरी संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात पिकांची नुकसानीचे आकडेसह अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभाताई धनोरकर , आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी, व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Comments