वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*रवींद्र शिंदे यांच्या शुभहस्ते चारगाव (बु) सहकारी संस्थेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न**“सहकार क्षेत्रातील प्रत्येक सहकारी संस्थेच्या पाठीशी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभी आहे” - रवींद्र शिंदे*

*रवींद्र शिंदे यांच्या शुभहस्ते चारगाव (बु) सहकारी संस्थेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न*

*“सहकार क्षेत्रातील प्रत्येक सहकारी संस्थेच्या पाठीशी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभी आहे” - रवींद्र शिंदे*

भद्रावती/वरोरा :
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. चारगाव (बु), तालुका वरोरा यांच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळाच्या भव्य कार्यक्रम दि 20ला मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष तथा सहकार क्षेत्रातील खंदे नेतृत्व रवींद्र शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रवींद्र शिंदे म्हणाले की, “सहकार क्षेत्रातील प्रत्येक सहकारी संस्थेच्या पाठीशी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे उभी आहे. सभासद, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी बँक सातत्याने कार्यरत आहे. सहकार हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही शक्तिशाली साधन आहे.”

या प्रसंगी संस्थेच्या वतीने रवींद्र शिंदे यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील सहकारी संस्थांना दिलेले भक्कम सहकार्य, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय व सहकार क्षेत्रात निर्माण केलेला विश्वास यामुळे त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यात बँकेचे संचालक व कर्ज समिती वरोरा विभाग अध्यक्ष जयंत टेमुर्डे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी माजी नगरसेवक तथा भद्रावती नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष आमणे, संस्थेचे अध्यक्ष दयारामजी नन्नावरे, उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा संचालक अभिजीत पावडे, संस्थेचे सचिव  प्रभाकर हनवते, संचालक मंडळ, गट सचिव, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने चारगाव (बु) सहकारी संस्थेच्या विकास यात्रेत एक नवा अध्याय सुरू झाला असून सहकार चळवळ अधिक भक्कमपणे पुढे नेली जाईल, असा विश्वास उपस्थित सभासद व नागरिकांनी व्यक्त केला.


Comments