श्री माता महाकाली महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महोत्सवाला पालकमंत्री मा. प्रा. डॉ. श्री. अशोकजी_उईके साहेब यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या हस्ते माता महाकालीची आरती तसेच चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी महाकाली मंदिर परिसर विकाससाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या दिवशी महोत्सवाचा विशेष आकर्षण ठरला ९९९ ज्येष्ठ मायमाऊलींचा भव्य सन्मान सोहळा. पालकमंत्री मा. प्रा. डॉ. श्री. अशोकजी उईके साहेब यांच्या हस्ते झालेल्या या गौरवपूर्ण सत्कारामुळे संपूर्ण महोत्सव भक्तिभाव आणि आनंदाने उजळून निघाला. सकाळी महिलांच्या जागर कवितेच्या कवी संमेलनातून कवयित्रींनी जनजागृती व भक्तीचा संगम साधला, तर दुपारी स्थानिक कलावंतांच्या नृत्यजल्लोषाने महोत्सवात उत्साहाची नवी उधळण झाली. या सर्व कार्यक्रमांमुळे भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळाला.
Comments
Post a Comment