व्हॉइस ऑफ मीडियाचा स्व. पत्रकार मनोज गाठले यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार ,लहानगी मितालीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मोटघरे यांची घोषणा

व्हॉइस ऑफ मीडियाचा स्व. पत्रकार मनोज गाठले यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार

लहानगी मितालीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मोटघरे यांची घोषणा

वरोरा :
         वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील पत्रकार व व्हॉइस ऑफ मीडिया शाखा वरोराचे सदस्य स्व. पत्रकार मनोज गाठले यांचे दि. 24 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचे आणि संकटाचे सावट पसरले आहे. व्हॉइस ऑफ मीडिया शाखा वरोरा च्या वतीने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

        स्व.मनोज गाठले हे दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात शेगाव प्रतिनिधी म्हणून काम करत होते. सोबतच ते स्वतःचे विदर्भ प्रतिष्ठा या नावाचे पोर्टल चालवत होते. त्यांचे दि. 24 जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचे आणि संकटाचे सावट पसरले आहे.  या कठीण काळात व्हॉइस ऑफ मीडियाच्या सदस्यांनी चारगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला. त्यावेळी आर्थिक सहाय्य म्हणून गाठले यांच्या पत्नीला संघटने तर्फे रोख 11000 हजार रुपयांची मदत देण्यात आली.

       याचसोबत व्हॉइस ऑफ मीडिया ग्रुपचे सदस्य बालकदास मोटघरे यांनी स्व. गाठले यांची लहान मुलगी मितालीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा करून खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवले. शालेय जीवनापासून उच्च शिक्षणापर्यंत लागणारे गणवेश, बुक, वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग आणि आवश्यक साहित्य ते स्वखर्चातून पुरविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य सदस्य अनिल पाटील, तालुकाध्यक्ष चैतन्य लुथडे,सचिव रवी खाडे, कोषाध्यक्ष सारथी ठाकूर,  व बालकदास मोटघरे यांनी चारगाव बु. येथे राहत्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस करून भविष्यात येणाऱ्या अडचणींना पत्रकार संघटना गाठले परिवारांच्या पाठीशी असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी अनिल नौकरकर, बालकदास मोटघरे, रवी खाडे, चेतन लुतडे,अनिल पाटील,सारथी ठाकूर, शिरीष उगे, प्रवीण कटाईत, शफी भाई, शाहिद अख्तर ,गोपाल निब्रड,अविनाश बन पत्रकारांनी सहकार्य केले.

Comments