वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी वरोरा, दि. 18 एप्रिल – येथील वनोजा गावाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खौरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर (वय ३५) जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चावरे व संदेश बुरडकर हे मोटारसायकल (क्र. MH 36 D 5653) ने वरोराहून खौरीकडे जात होते. माढळीकडून वरोराकडे येणाऱ्या ट्रक चालकाने वेग व निष्काळजीपणा करून त्यांच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन चावरे यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला व त्यांचा मृत्यू झाला. जखमी संदेश बुरडकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताचे काका विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

कार आणि शेतमजूर भरलेल्या ऑटोचा अपघात. दोन महिला शेतमजुरांचा मृत्यू 13 जन जखमी.

कार आणि शेतमजूर भरलेल्या ऑटोचा अपघात. 
दोन महिला शेतमजुरांचा  मृत्यू 13 जन जखमी.


वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा शहरापासून  दहा किलोमीटर अंतरावर येन्सा या गावामध्ये ऑटो आणि कार यांच्या अपघातामध्ये दोन महिलाचा मृत्यू झाला असून 13 जण किरकोळ जखमी झाले आहे. 
येन्सा या वळणावर  बौद्ध भिक्षुक  कार क्रमांक Mh31 AM8313 आर्टिका ने चंद्रपूरकडे जात असताना समोरच्या ऑटोला धडक दिली. शेतकरी महिला कामगार रामपूर येथे काम संपवून वरोर्याच्या दिशेने जात असताना ऑटो क्रमांक Mh34D4515 ला मागून धडक दिल्याने नागपूर चंद्रपूर महामार्गावर अपघात झाला. या अपघातामध्ये  रंजना चंद्रकांत झुंजूनकर  वय 50 आणि सविता अरविंद बुरटकर यांच्या अपघाती मृत्यू झाला आहे. बाकी जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असून. गंभीर जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्व मजूर वरोरा येथील रहिवासी असून मोलमजुरीसाठी रामपूर या गावात शेतीचे काम करण्यासाठी गेले होते. वरोरा शहरात वापस येताना हा अपघात घडला.पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.
मृतक परिवारातर्फे राष्ट्रवादीच्या नेत्या  रंजना पारशिवे यांनी मृतक परिवारांना तात्काळ आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे. 


Comments