वरोरा शहरात सर्वसमावेशक गणेशोत्सव; विसर्जनासाठी उत्तम व्यवस्था.मुख्याधिकारी विशाखा शेळके यांची गणपती मंडळांना भेट.
*मुख्याधिकारी विशाखा शेळके यांची गणपती मंडळांना भेट.
*भजन करी सोबत नृत्य करून सांस्कृतिक ठेवा जपला.
कल्पतरू गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन.
चेतन लूतडे
वरोरा : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसासाठी वरोरा नगरपालिकेने गांधीसागर तलावावर विसर्जनासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे. यावर्षीही सर्व मंडळांना सोयीस्कर व स्वच्छ परिसरात विसर्जन करता यावे यासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाखा शेळके यांनी स्वत: जाऊन तलावाची पाहणी केली होती.
नगर परिषदच्या महिला कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गणपती विसर्जनासाठी गांधीसागर तलावातील आंबेडकर चौक ही मुख्य जागा नियुक्त करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या मंडळांच्या वाहतुकीसाठी नागपूर चौक ते डोंगरवार चौक या परिसरात येणे-जाणे सोपे व्हावे यासाठीही योग्य रस्ते मोकळे ठेवण्यात आले आहेत. परिसरात भक्तांसाठी रोटरी क्लबतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर सह्याद्री राखणदार तर्फे थेट प्रक्षेपण सुरू झाले आहे.
विसर्जन सोहळ्याला समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून आला. मुस्लिम समाजातर्फेही दरवर्षी स्टॉल लव मंडळाचे स्वागत केले जाते. सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नयेत यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. अजिंक्य तांबडे ठाणेदार, वरोरा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तैनात होते.
या निमित्ताने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विशाखा शेळके यांनी विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर येथील गणपतीच्या आरतीत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना संविधानाची प्रस्तावना, झाडाची रोपटी व श्रीफळ देऊन स्वागत केले. ही संविधानाची प्रत देण्याच्या कृतीद्वारे लोकशाही मूल्यांना व सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेशोत्सवात आलेल्या भजन मंडळी सोबत भाजनावर नृत्य करीत या सांस्कृतिक कार्यक्रमात आपला सहभाग दर्शविला.
या विसर्जन सोहळ्यासाठी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी तैनात राहिले होते. पर्यावरणास अनुकूल असलेल्या या कार्यक्रमात झाडाची रोपटे देण्याच्या सांकेतिकतेद्वारे हिरवळीचे महत्त्वही पुन्हा एकदा पटवण्यात आले.
गणपती विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात वरोरा शहरात पार पडत आहे. यावेळ राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे स्वागत करताना दिसत होते.
*****************************
Comments
Post a Comment