वरोऱ्यात खून; आरोपी अटक

वरोऱ्यात खून; आरोपी अटक

वरोरा : वरोऱ्यात एका मंदिराजवळ रहिवासी नितीन चुटे (वय सुमारे ३५ वर्षे) यांचा एका आरोपीने केलेल्या शस्त्रहल्ल्यात मृत्यू झाला. ही भीषण घटना गेल्या ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८:१५ वाजता घडली.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अमोल नवघरे (वय अंदाजे ३५ वर्षे, राहणार हनुमान वॉर्ड, वरोरा) आणि मृतक नितीन चुटे यांच्यात काही वाद झाला. त्यानंतर मृतक तेथून निघून साई मंगल कार्यालयाजवळ आला असता, आरोपी त्याच्या मागे गेला आणि एका शस्त्राने त्याच्या शरीरावर सफासफ वार करून त्याला गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेत नितीन चुटे याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर काही तासातच, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक भस्मे, पो. का. सोनोने, नवघरे व प्रशांत नागोसे यांनी वणी रोडवर आरोपी अमोल नवघरे याला अटक करण्यात यश मिळविले. आरोपीवर योग्य कलमे लावून पुढील कारवाई सुरू आहे.


Comments