सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात. आमदार देवतळे शेतकऱ्यांच्या बांधावरहजारो एकरांवर रोगराईचा विळखा; पंचनाम्यांचे आदेश देत शेतकऱ्यांना दिलासा


सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात.

 आमदार देवतळे शेतकऱ्यांच्या बांधावर

हजारो एकरांवर रोगराईचा विळखा; पंचनाम्यांचे आदेश देत शेतकऱ्यांना दिलासा

वरोरा  तालुका प्रतिनिधी : वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. येलो मोझॅक विषाणुजन्य रोग, खोडकिडा आणि मुळकुच (कॉलर रॉट) या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात सापडली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांनी सोमवारी (८ सप्टेंबर) प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली.
शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत तातडीने दिलासा मिळावा म्हणून आमदार देवतळे यांनी प्रशासनाला पंचनाम्यांचे आदेश दिले. तसेच, पावसामुळे झालेल्या नुकसानीचाही तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात आमदार देवतळे यांनी निमसडा, कोंढाळा, टेमुर्डा, चिंचाळा, आबमक्ता, चारगाव खु., शेगाव (बु.), शेगाव (खु.), महालगाव, चंदनखेडा व मांगली या गावांचा फेरफटका मारला. करपलेली पानं व रोगट झालेली उभी शेती पाहून शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या त्यांनी गांभीर्याने ऐकल्या. शेतकऱ्यांचा विश्वासघात होणार नाही, शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून दिलासा मिळवून देणे हीच माझी प्राथमिकता आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.


पाहणीदरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी हिरणखेडी, तालुका कृषी अधिकारी सुशिल आडे, वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर, भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर, भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गजानन मुंडकर, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक मनोज जोगी, मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, विकास चवले, शाम पाटील, पीक विमा अधिकारी तसेच स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्ते विठ्ठल लेडे, बाळासाहेब भोयर, वासुदेव उरकाडे, वंदना दाते, राजु सवई, सुधिर धामट, विलास झिेले, अरुण बरडे, राजीव दोडके, ईश्‍वर नरड, सुरज धात्रक, धिरज दारुडे, मारोती गायकवाड, दयानंद जांभुळे, मंगेश मत्ते, सुरज चौधरी, प्रभाकर मत्ते, गजानन रणदिवे, सतिश कांबळे आदींसह गावचे सरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार देवतळे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. यासोबतच, शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची हाक हीच माझी जबाबदारी आहे. त्यांच्या सोबत उभं राहून संकट काळात त्यांना आधार देणे हाच माझा खरा धर्म आहे,असे सांगत आमदार देवतळे यांनी शेतकऱ्यांचा विश्वास दृढ केला.
***********************
जाहिरात 

Comments