खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत १०६७ प्रकरणे निकाली*

*चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत १०६७ प्रकरणे निकाली*

चंद्रपूर, दि. १३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.
यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून  २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून  १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला, तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.

या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, अशी माहिती  एस. एस. इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली.

Comments