जिल्हाप्रमुख नितीन मते आणि डुकरे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन.
प्रशासनाची तारांबळ उडाली.
वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन मंगळवारी आनंदवन चौक येथे करण्यात आले.
बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चिमूर रोडवरील आनंदवन चौकामध्ये शेतकऱ्यांनी रोड जाम करून सरकार विरोधी घोषणा देत रस्ता बंद केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त असून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी समजण्याच्या परिस्थितीत नव्हते. नितीन मते आणि किशोर डुकरे यांनी शेतकऱ्यांना संबोधन करीत रस्ता अडवून धरला होता.
शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन असल्याचे सांगून पोलिसांनी आम्हाला अटक करावी. अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आनंदवन चौकातील आंदोलन उग्र होत चालले होते. उपविभागीय अधिकारी बकाल यांनीओ समजावण्याचा प्रयत्न केला . मात्र आंदोलन तीव्र करीत आनंदवन चौक ते पोलीस स्टेशन वरोरा लगभग तीन किलोमीटर मार्गावर सर्व शेतकरी चालत जाऊन वरोरा पोलीस स्टेशन गाठले. मात्र वरोरा पोलीसांनी आंदोलकास आतमध्ये येण्यास मज्जाव केल्याने आंदोलन तीव्र झाले. आंदोलकांचा मोर्चा तहसील कार्यालयात वळला. बराच काळ या ठिकाणी आंदोलक बसून राहले. मागील बरंच वेळापासून हीच परिस्थिती तहसील कार्यालयामध्ये दिसून आली. आंदोलन तहसील कार्यालयाच्या परिसरात ठिय्या मांडून बसले होते.
वरोरा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी वरिष्ठासोबत संपर्क साधून शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले. सोयाबीन हे पिक महिन्यापासून पाण्यामध्ये असल्यामुळे मूळ सड आणि खोड सड याची पाहणी करून तात्काळ त्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी मते यांनी केली आहे . यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी आंदोलन थांबविले.
Comments
Post a Comment