प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*सीटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम*

*सीटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम*

चंद्रपूर, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सीटी हायर सेकंडरी स्कूल, सिटी कन्या विद्यालय व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भिष्म यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी हायस्कूल चंद्रपूर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. कुलकर्णी यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अॅड. महेन्द्र असरेट यांनी प्राधिकरणाच्या विविध योजना व विधी सहाय्याबाबत माहिती दिली. याप्रसंगी केअर क्लबच्या सदस्या व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सानिका तिवारी, आचल नैताम, अर्चिता टिकेदार व सनिग्धा भक्ते यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला चांदा शिक्षण मंडळाच्या सहसचिव वसुधा रायपुरे, सिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका अॅनेट लाल, सिटी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिमा नायडू व हिन्दी सिटी हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कार्यकमाचे संचालन मंजुषा घागी यांनी तर आभार शितल तायवाडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

००००००

Comments