मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न
वरोरा
चेतन लूतडे
भद्रावती : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' व महिला सक्षमीकरणासाठीच्या 'आदिशक्ती अभियान' अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी जे. के. पॅलेस, भद्रावती येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भूषवले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत हीच गावाच्या विकासाची खरी किल्ली असून, राज्य व केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जनजागृती करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 'आदिशक्ती अभियान' ही काळाची गरज आहे.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला तहसीलदार श्री. राजेश भंडारकर, पोलीस अधिक्षक श्री. योगेश पारधी, गटविकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पुनम गोडाम, जनप्रतिनिधी श्री. बंडू आकनुरवार, श्री. ओमकेश दराडे, डॉ. दिपक बिहातिया, श्रीमती छायाताई जंगम, श्री. मंगेश भोयर, श्री. बंडू नलावरे, श्रीमती चालेकर, श्रीमती भागवत, डॉ. शाहीज सय्यद, श्री. प्रकाश खरवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेद्वारे दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि ग्रामीण भागातील विकास व महिला सक्षमीकरणाला गती देण्याचे ठरविण्यात आले.
Comments
Post a Comment