कल्पतरू युवकांनी रील स्पर्धेच्या माध्यमातून सर्जनशीलता केली चकित; सन्मान सोहळ्यात गौरवण्यात आले.

कल्पतरू युवकांनी रील स्पर्धेच्या माध्यमातून सर्जनशीलता केली चकित; सन्मान सोहळ्यात गौरवण्यात आले.

इन्स्टा रिल चा अनोखा प्रयोग. कल्पतरू गणराय आगमनाचे युवकांनी बनवल्या शेकडो रील्स.

चेतन लूतडे 
वरोरा, ५ सप्टेंबर २०२५: कल्पतरु सोशल यूथ फाउंडेशन व कल्पतरु गणेशोत्सव मंडळ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रील स्पर्धेचा सन्मान सोहळा गेल्या ४ सप्टेंबर रोजी कल्पतरू गणेश मंडळ, गांधी चौक येथे पार पडला.

कल्पतरु गणेश आगमन सोहळा २०२५ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल ८० हून अधिक तरुण सहभागींनी सर्जनशील रील्स तयार करून मंडळाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजला टॅग करून सहभाग नोंदवला. सर्व सहभागींनी त्यांच्या कलात्मकता आणि डिजिटल कौशल्याने उत्सवाला एक नवीन आणि आधुनिक उर्जा दिली.

या सोहळ्यात सर्व सहभागी उमेदवारांना स्मृतिचिन्न म्हणून प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर, स्पर्धेमध्ये ठाम कामगिरी बजावणाऱ्या 'टॉप ३ रील स्टार्स' यांना विशेष पारितोषिके आणि आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स देऊन सन्मानित करण्यात आले.

पारितोषिक वितरण करणारी मंडळातर्फे पुढीलप्रमाणे:

· *प्रथम पारितोषिक* : ओमकार भोयर यांना मंडळातर्फे शिल्ड, प्रमाणपत्र व 'द मोबाईल एक्सपर्ट' यांच्याकडून गिफ्ट. देण्यात आले. 

· *द्वितीय पारितोषिक:* मंडळातर्फे शिल्ड, प्रमाणपत्र व चेतन शर्मा यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले. 

· तृतीय पारितोषिक: मंडळातर्फे शिल्ड, प्रमाणपत्र व सोनू मालू यांच्याकडून गिफ्ट.
· चौथे पारितोषिक: मंडळातर्फे शिल्ड, प्रमाणपत्र व बाबूलाल आईस्क्रीम यांच्याकडून गिफ्ट.

या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा, इतर पदाधिकारी आणि सर्व सक्रिय सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
 सोहळ्यादरम्यान सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे तरुण पिढीतील सर्जनशीलता आणि समाजासाठीची जबाबदारी यावर एक चांगला प्रकाश टाकण्यात आला. मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहभागींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




---

Comments