चंद्रपूर विभागात पाण्यात अडकलेली बस, प्रवासी सुखरूप चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली घटना; बचाव कार्य सुरू
चंद्रपूर विभागात पाण्यात अडकलेली बस, प्रवासी सुखरूप चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाली घटना; बचाव कार्य सुरू
चंद्रपूर, १२ सप्टेंबर २०२५: चंद्रपूर आगाराची एक बस गुरुवारी संध्याकाळी भादुर्ली ते मुल मार्गे जात असताना एका बोगद्यात पाण्यात अडकली. घटनेत तीन प्रवासी आणि चालक सुखरूप आहेत.
दिनांक १२ सप्टेंबर रोजी साधारण संध्याकाळी ६.१५ वाजता एमएच४० एन ९४२६ या क्रमांकाची बस जेव्हा रेल्वेपटरीखालील बोगद्यात आली, तेव्हा तेथे साधारण एक ते दोन फूट पाणी जमले होते. अंदाज घेऊन चालकाने बस पुढे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु या दरम्यान वाहनाच्या सायलेन्सरला पाणी लागल्यामुळे गाडी बंद पडली. त्यानंतर पावसामुळे पाणी वेगाने वाढल्यामुळे गाडीच्या रेडिएटरपर्यंत पाणी पोहोचले आणि बस तेथेच अडकली. सदर बसमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते.
प्राथमिक तपासानुसार, ही घटना मुख्यत्वे चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडलेली असल्याचे समजते.
घटनेनंतर घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता तसेच यंत्रणेचे इतर कर्मचारी बस बाहेर काढण्यासाठी पोहोचले आहेत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
सर्व प्रवासी आणि चालक सुरक्षित असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे.
Comments
Post a Comment