वनविभागाचे गावकऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
चंद्रपूर
चेतन लूतडे
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात दुपारी वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ही घटना बुधवार दुपारी अंदाजे बारा वाजता भांमडेळी गावाजवळ घडली.
मृतक अमोल बबन नन्नावरे (वय ४५) हे भांमडेळी गावाचे रहिवासी होते. स्थानिक नागरिकांनुसार, इरई धरणाच्या बाजूला ते शेतातील कापूस पिकावर फवारणी मारत असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या भीमा नावाच्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे वडील आणि मित्र त्या ठिकाणीच काम करीत होते. आरडा ओरड केल्यानंतर काही वेळाने मृतदेह सोडून वाघ जंगलात गेला. मात्र तोपर्यंत नन्नावरे यांचा जीव गेला होता. वनविभाग गावकऱ्यांच्या तक्रारी व सूचनावर लक्ष देत असून प्राण्यांचे हल्ले गावकऱ्यांवर वाढलेले आहे.
घटनेची खबर मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, घटनेची तपासणी सुरू आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्या रोष व नैराश्याचे वातावरण आहे.
या घटनेमुळे अमोल नवरे यांच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. ते आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहित एक छोटेसे कुटुंब सोडून गेले आहेत. त्यांचा मृत्यू या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या उघड्यावर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण करेल, अशी चिंता नातेवाईक व्यक्त करत आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये माणस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात वाघ, बिबट इत्यादी वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांचे जीवन धोक्यात असल्याची चिंता गावकरी करीत आहे.
Comments
Post a Comment