वरोरा :
शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे तथा शिवसेना परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वरोरा शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक गणेश मंडळांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वागत मंडप उभारण्यात येतो. यंदाही या परंपरेनुसार मंडळांचा सन्मान करण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पारंपरिक उत्साहात शहरातील गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहानग्यांसाठी चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
गेल्या दहा दिवसांपासून शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी भक्तिभावाने गणरायाची सेवा करत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले. या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवसेना परिवाराने सर्व मंडळांचा सन्मान केला.
यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***************************
Comments
Post a Comment