वरोर्यात ईद मिलादुन्नबी सोहळ्यात सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत समाजबांधवांचा सत्कार

वरोर्यात ईद मिलादुन्नबी सोहळ्यात सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत समाजबांधवांचा सत्कार

वरोरा : पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त ईद मिलादुन्नबी सोहळ्याच्या निमित्ताने वरोरा शहरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. वरोरा मुस्लिम समाज व ईद मिलादुन्नबी कमिटी यांच्या वतीने आयोजित रॅलीत मौलाना, पदाधिकारी आणि हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच फुलांच्या बरसावाने त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
जाहिरात
********************************
सर्व धर्मात समभाव राखण्याच्या संदेशासह, गुरुदेव सेवा मंडळ आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, विलास टिपले , दिपाली माटे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना पक्षाचे मुकेश जीवतोडे तसेच इतर राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाच्या नागरिकांचा सत्कार केला.

या रॅलीमध्ये वरोरा मुस्लिम कमिटीचे असिफ रजा, छोटू भाई शेख, जावेद रजा, इमरान शेख, शब्बीर शेख, शकील खान, मोहसिन रजा, जावेद पठाण, जावेद अंसारी, साजिद पठाण यांच्या सहभागासह वरोरा येथील काजीपुरा कमिटी, आजाद वार्ड कमिटी, कासमपंजा कमिटी, मालवीय वार्ड कमिटी, नई बस्ती समाज भवन कमिटी, कच्ची मस्जिद कमिटी, अब्दुल कलाम चौक मिल्लत इस्लामिया कमिटी इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाद्वारे शहरात शांतता, सद्भाव आणि सर्वधर्मीय एकात्मतेचा संदेश प्रसारित करण्यात आला.


**********


Comments