वरोरा येथील जगन्नाथ महाराज मंदिराच्या कळसावर वीज पडली.

वरोरा येथील जगन्नाथ  महाराज मंदिराच्या कळसावर वीज पडली. 

हा शुभ संकेत असल्याने भक्तांचे श्रद्धास्थान बनले.

वरोरा 
चेतन लूतडे 

                           जाहिरात
 वरोरा शहरात सोमवार  सकाळी विजेच्या कडकडारासह पाऊस पडत असताना वरोरा शहरातील जगन्नाथ मंदिरावर वीज पडल्याने मोठे भगदाड पडले. माढेळी चौकाजवळील कुरेकार यांच्या शेतात असलेल्या माऊली पार्क मार्डा रोड या मंदिराच्या कळसावर वीज पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी मंदिराच्या कळशातून महाराजांच्या मूर्तीवर डोळ्याजवळ खर्चटलेला काळाभागावर विज पडल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहे.
या ठिकाणी साक्षात जगन्नाथ महाराज दोन-तीन दिवस थांबले होते. यानंतर कुरेकार परिवाराने हे मंदिर या ठिकाणी उभारले. मंदिर साक्षात असल्याची माहिती भक्तांनी दिली आहे.
या घटनेदरम्यान मंदिरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु वीज पडल्यामुळे मंदिरातील इलेक्ट्रॉनिक सामान खराब झाले.  या प्रसंगानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्थानिक संस्थाचालकांनी सांगितले. भक्तांची पूजा-अर्चा सुरू ठेवण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे. 
वरोरा शहरातील ही दुसरी घटना असून शहरातील रामदेव बाबा मंदिरावर वीज पडली होती.

आज नवरात्रीची घटस्थापना त्यामुळे हा शुभसंकत मानला जातो. जगन्नाथ मंदिराच्या मठावर वीज पडणे आणि घटस्थापना नवरात्री उत्सवाची सुरुवात हा दुर्मिळ योग बनलेला आहे. त्यामुळे या मंदिराची महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत जाणकारांच्या आहे. 
वीज पडण्याचा पारंपारिक व धार्मिक संकेत

हिमाचल प्रदेशातील बिजली महादेव मंदिराच्या कथेनुसार, प्रत्येक १२ वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंग तुटते.
या स्थळी अशी मान्यता आहे की भगवान शिव स्वतः वज्र किंवा बिजली धारण करतात आणि भक्तांचे दुःख दूर करतात.

वीज मंदिरावर पडल्यास, काही परंपरांमध्ये ते देवाच्या शक्ती, प्रसन्नता, किंवा भक्तांसाठी संदेश आहे, तर काही ठिकाणी धार्मिक - शुद्धीचा किंवा नवे शुभारंभाचा संकेत मानला जातो.

विशेष कथा किंवा स्थानिक लोक-परंपरेनुसार अशा घटनांना दैवी हस्तक्षेप मानले जाते; तांत्रिक दोष किंवा अशुद्धता शुद्ध करणं, किंवा देवाच्या कृपेचा संदेश मानला जातो.

ही घटना वैज्ञानिक कारणांमुळेही होत असते, पण पारंपारिक लोकमान्यतेत यामागे दैवी अर्थ असतो असे मानतात.
*********************
जाहिरात
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. पंकज नाशिककर ,वरोरा

Comments