भद्रावतीत ईद-ए-मिलादुन्नबी सोहळा धार्मिक उत्साहात साजरापैगंबर मोहम्मद साहेबांच्या जन्मदिनी शहरात प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचा संदेश दिला
पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जन्मदिनी शहरात प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचा संदेश दिला
रवी बघेल भद्रावती
भद्रावती : पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जन्मदिनानिमित्त शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मुस्लिम समुदायाने प्रेम, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश दिला.
सकाळी आठ वाजता गरीब नवाज मज्जिद व मदिना मस्जिद येथे इस्लामिक ध्वज फडकवून उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर नात शरीफांच्या मधुर स्वरात, हातात इस्लामिक झेंडे घेऊन मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मक्का-मदीना आणि काबा शरीफ यांचे आकर्षक जाकीतर्फे घोडे बग्गी व झेंडे सादर करण्यात आले होते, जे पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले.
शहरभरात शांतता आणि भाईचार्याचा संदेश देत मिरवणूक पुढे सरकली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी मिठाई, शरबत व खाद्यपदार्थ वाटप करून मिरवणूकीचे उत्साहाने स्वागत केले. मिरवणूक भोजवाड, मदिना मज्जिद भंगाराम वॉर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील वॉर्ड येथून होती डोलारा तलाव वॉर्ड येथे पोहोचली. तेथे जुलसे मोहम्मद दिया यांच्याकडून खीर व मसाला भात यांचे आयोजन करण्यात आले होते. नंतर मिरवणूक चंद्रपूर-नागपूर हायवे बाळासाहेब प्रवेशद्वार, मेन रोड, जामा मज्जिद चौक मार्गे परत फिरली.
कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मिरवणूक नंतर मौलाना हाफिज अब्दुल गफार अन्सारी, हाफिज मुजमिल, मौलाना फारुख हाफिज कौनन रजा यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेम, भाईचारा आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित केले. गरीब नवाज मज्जिद, मदिना मस्जिद व जामा मस्जिद यांच्या वतीने जिलेबी व मसाला भात वाटप करण्यात आला.
या सर्व आयोजनात नवीन पिढीने मोलाची भूमिका बजावली. माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक चंदू खारकर यांसारख्या व्यक्तींनी उपस्थित राहून सोहळ्याला यशस्वी केले. ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या मुस्लिम बांधवांनी शहर रोषणाईत न्हाले होते.
Comments
Post a Comment